श्री  महालसा नारायणी मंदिराचा चतुर्थ  शतकोत्तर सुवर्ण महोत्सव दि.०७/११/१० ते १९/१२/१० या काळात म्हार्दोळ येथे साजरा झाला. त्यादरम्यान जांभेकर प्रतिष्ठान तर्फे २०/११/१० रोजी एक संगीतमय सेवा श्री  महालसा चरणी अर्पण केली त्याची ही थोडीशी झलक.

या महालसा-आनंद गीताचे कवी आहेत श्री. उदय जांभेकर 

नंद पोटात माझ्या माईना- ||धृ||

गेलो म्हार्दोळाला थेट

घेतली म्हाळसेची भेट-
या या भेटीची
हौस पुरी होईना ||||

अवघ्या जीवनाचा अर्थ

जीवन झाले हो कृतार्थ-
या या उत्साहास
दाखवा गात्रांना||||
 

टाळ मृदुंगाची गाठ
त्यास भक्तांची साथ-
या या आरतीस
ऐकवा कानांना ||||

झालो दर्शनात दंग

व्यापी अवघे अंतरंग-
या या सोहळ्यास
पाहूद्या नेत्रांना||||

महालसेचा हा उत्सव

साडेचारशेवा महोत्सव-
या या उत्सवात
मेळवू सर्वाना ||||

 प्रतिष्ठानचे  अध्यक्ष मा.श्री.मनोहर जांभेकर मनोगत व्यक्त करताना

प्रतिष्ठानचे सचिव श्री.उदय जांभेकर टिप्पणी करत असताना 

सौ.रश्मी जांभेकर निवेदन करत आहेत

श्री महालसा चरणी श्री.व सौ.पाटणकर आणि श्री.व सौ.पटवर्धन यांनी गोंधळ सदर केला

चिमुरडी निष्ठा गाऊन देवी-वंदन करत आहे. 

Make a Free Website with Yola.